इचलकरंजीतून आंदोलनास मराठा समाज जाणार !

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा निर्धार येथील इचलकरंजी व परिसरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित बैठकीत करण्यात आला.
मुंबई आंदोलनास जाण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.त्यात इचलकरंजी व परिसरातील समाज बांधवांचा समावेश करण्यात आला आहे.ज्या मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे.त्यांनी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले.बैठकीत संतोष सावंत यांनी स्वागत केले.प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.आनंदराव उदाळे,अरविंद माने,अमरजीत जाधव,संजय जाधव,शहाजी भोसले, नितीन पाटील,मोहन मालवणकर,धनाजी खोपले,भारत बोंगार्डे,नितीन कटके,आनंदराव वाझे,वैभव खोंद्रे,उत्तम हुजरे,रामचंद्र भोसले,अवधूत मुडशिंगकर,रामदास टिकले,विकास खोत,नंदकुमार लोखंडे,धनंजय पाटील, रामचंद्र भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी दिनकर ताफेकर,सागर जाधव,ऋषिकेश मुसळे,सुरेश कापसे, किशोर थोरात,युवराज पाटील,अभिजीत जाधव,युवराज कदम,भरत खडसारे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!