जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे मंडप मुहुर्तमेढ

Spread the love

जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे मंडप मुहुर्तमेढ

जयसिंगपूर / प्रतिनिधी

जयसिंगपूरमधील हेरवाडे कॉलनी येथे होणा-या श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाच्या मुख्यमंडपाचे मुहुर्तमेढ धर्मानुरागी यजमान सौ. प्रज्ञा व मनिष कुसनाळे व सर्व सवालधारक यांच्या हस्ते झाले. श्री १००८ भगवान चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये ता.३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान महोत्सव होणार आहे.दरम्यान सकाळी सौधर्म इंद्र-इंद्राणी यांच्या निवासस्थानापासून मिरवणूकीने मंदिरामध्ये सर्वांचे आगमन झाले. त्यानंतर भगवंताचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर मुख्यमंडप मुहुर्तमेढ विधीवत पूजन व मुहुर्तमेढ रोवला.यावेळी सौधर्म इंद्र-इंद्राणी मनीष कुसनाळे, धनपती कुबेर धनपाळ बेळंकी, यज्ञनायक दिग्विजय चौगुले, ईशान्य इंद्र-इंद्राणी सुरेश भोकरे, सानतकुमार इंद्र-इंद्राणी प्रकाश देसाई, माहेंद्र इंद्र-इंद्राणी सुमती पाटील पूजा केले.यावेळी सुरज बुरसे, चिन्मय चौगुले, कुमार चुडाप्पा, प्रफुल्ल पाटील, शितल पाटील, विमल मानकापुरे, अष्टकुमारीका आदिती सिदनाळे, शुभ्रा चौगुले, श्रृती हेरले, तन्वी उपाध्ये, प्राप्ती किणीकर, अकिंता मुरगुंडी, स्नेहल दत्तवाडे आदी उपस्थित होते

error: Content is protected !!