शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक चळवळीची नितांत गरज-डॉ कुमार पाटील

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरोळ तालुक्याच्या वतीने व झेले हायस्कूल जयसिंगपूरच्या सहकार्याने 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिरोळ तालुका अध्यक्ष राजेश शंभुशेटे यांच्या अध्यक्षतेखाली,झेले हायस्कूल जयसिंगपूर येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राचे सहा.वैद्यकिय अधिकारी डॉ कुमार पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याध्यापक भरत सावळवाडे सर व ज्येष्ठ अध्यापक श्री प्रशांत शेटे सर उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापक श्री सावळवाडे सर यांनी करून दिले.आपल्या व्याख्यानात डॉ. कुमार पाटील यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत संस्थापक ग्राहकतीर्थ श्री बिंदू माधव जोशी यांच्या ग्राहक चळवळीच्या कार्याचा गौरव करून ग्राहक चळवळीला लोकमान्यता,राजमान्यता व न्याय मान्यता मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला व ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत ग्राहकांच्या सर्वांगीण हितासाठी आवश्यक गोष्टी सांगून ग्राहक चळवळ टिकवण्यासाठी ग्राहकांची जागृती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. डॉ कुमार पाटील यांनी आपल्या व्याख्यानात पुढे बोलताना ग्राहक संरक्षण अंतर्गत ग्राहकांना सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळवण्याचा हक्क,वस्तू निवडण्याचा हक्क, तक्रार निवारण निवारण्याचा हक्क,ग्राहक शिक्षणाचा हक्क व आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क या 6 गोष्टींचा उहापोह करून त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुसंस्कार, आरोग्य याविषयी योग्य मार्गदर्शन केले.यावेळी झेले हायस्कूलचे अध्यापक राकेश पाटील,एस डी पाटील, अमोल पाटील,हादिमनी सर,सुभाष मुरगुंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन एन एम कोटेकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत शेटे सर यांनी केले.यावेळी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!