जयसिंगपूरात 3 फेब्रुवारीपासून 7 वे भव्य कृषी प्रदर्शन

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे 3 फेब्रुवारी 2024 पासून सहकाररत्न स्व.शामराव पाटील यड्रावकर यांच्या जंयती निमित्त शरद सहकारी साखर कारखाना नरंदे,शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय भव्य 7 वे शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संचालक अदित्य पाटील यड्रावकर यांनी दिली. जयसिंगपूर येथील सिध्देश्वर मंदिर समोर गल्ली नंबर 3 मध्ये 7 वे शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन (दि.03 ते 6 फेब्रुवारी 2024) रोजी केले असून प्रदर्शन सकाळी 10 वाजलेपासून रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहणार आहे.या प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी औजारे,बि-बियाणे,खते व जंतू नाशके, जलसिंचनाच्या पध्दती,ठिबकसिंचन, टिश्युकल्चर,कृषी व्यवस्थापक,शेती अर्थ पुरवठा,बैंकोंग इन्स्युरन्स,मार्केटींग व्यवस्थापन, रोपवाटीका (नर्सरी), पाणौ व्यवस्थापन, दुग्धव्यवसाय,अपारंपारीक उर्जा, मत्स्य उत्पादन, रेशीम उद्योग,सेंद्रीय शेती याचबरोबर अन्य प्रक्रिया व साठवणूक,पॅकेजीग पध्दती या माहीतीबरोबर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा व तालुका कृषी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंर्तगत येणा-या महाविद्यालयाकडून विविध प्रात्यक्षिके दाखविले जाणार आहेत.जातीवंत जनावरे,ऊसपीक व इतर पिकांसाठी स्पर्धा व तांदूळ महोत्सव, खियडी महोत्सव, कॅट व डॉग शो स्पर्धा यांचेही आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन रिसोर्सेस इव्हेंटचे राजेश शहा यांनी केले आहे.यावेळी कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील,सुभाषसिग रजपूत,अविनाश खंजिरे, पोपट भोकरे,दशरथ पिष्टे,शिवगोडा पाटील, धनपाल मरजेे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी भुपाल आवटी उपस्थित होते.
error: Content is protected !!