कवठेगुलंद ( ता.शिरोळ) येथील लाल बहाद्दुर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रिडा स्पर्धा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडल्या.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व व्यासपीठ धाडस निर्माण करण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते.लाल बहाद्दुर विद्यालयाच्या सर्वच वर्गातील विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन लोककला,चित्रपटातील नृत्य,ऐतिहासिक देखावा ,नाटीका असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षा सौ.मनिषा डांगे,श्री किसान सेवा शिक्षण संस्थेंचे चेअरमन श्री.सुरेशराव शहापुरे,मान्यवर पत्रकार यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,पदक
देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.डांगे म्हणाल्या की,लाल बहाद्दुर विद्यालयाने शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याना कला,क्रिडा,सांस्कृतिक गुणासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.शाळेला प्रशस्त क्रिडागण,प्रशस्त इमारत,नयरम्य परिसर आहे. यामुळे येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळते.अटल लॅब,संगणक कक्ष,डिजीटल क्लासरुम,अशा अत्याधुनिक शैक्षणिक सामुग्रीने सज्ज असलेली तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे.असे गौरवोग्दार त्यांनी काढले.यावेळी विद्यालयात सुरु करण्यात आलेल्या डिजीटल क्लासरुमचे उदघाटन सौ.डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.पत्रकार दिनानिमित्त कवठेगुलंदसह सात गावातील पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक,सांघिक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सौ.डांगे,श्री.शहापुरे,सर्व पत्रकार यांच्या हस्ते प्रमाणपत्र,पदक,पुष्प देऊन गौरविण्यात आले.कोल्हापुरचे प्रसिद्ध जादुगार शंशाक यांनी आपल्या जादुच्या विविध प्रयोगाने विद्यार्थ्यांची मने जिंकली.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.मुख्याध्यापक बी.आय.शेख यांनी स्वागत केले.सुत्रसंचालन व्ही.एस.कांबळे यानी तर आभार व्ही.आर.सनदी यांनी मांडले.कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.