माजी नगराध्यक्ष शामसुंदर मालू “जयसिंगपूर भूषण 2024” ने सन्मानित

Spread the love

शामसुंदर मालू जयसिंगपूर भूषण 2024 ने सन्मानित

 

रोटरी क्लब जयसिंगपूर व पद्म फाउंडेशन तर्फे 19 वा जयसिंगपूर भूषण पुरस्कार सोहळा संपन्न जयसिंगपूर शहरात गेली १८ वर्षे अखंडितपणे दिला जात असलेला जयसिंगपूर भूषण हा पुरस्कार चालू वर्षी कै.बी.ए.

 

माणगावे सर यांच्या स्मृतिपित्यर्थ जयसिंगपूर शहराचे माजी नगराध्यक्ष सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी उद्योजक शामसुंदर मालू यांना शानदार सोहळ्यात हा 19 वा पुरस्कार प्रदान करण्यात आला जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव

 

पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये झालेल्या सुंदर अशा कार्यक्रमात भारतातील रोटरी परिवारातील प्रसिद्ध वक्ते व उद्योजक मोहन पालेशा पुणे माजी प्रांतपाल रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल रोटेरियन नासिर बोरसत्वाला असिस्टंट गव्हर्नर रोटे श्रीकिशन भुतडा पद्म फाउंडेशनचे चेअरमन भरत

 

माणगावे रोटरी क्लब जयसिंगपूरचे अध्यक्ष रोटरी संजय माणगावे सेक्रेटरी रोटे विद्यासागर आडगाणे इव्हेंट चेअरमन स्वप्निल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी रोटरीच्या मीटिंगची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.कार्यक्रमाची सुरुवात फोर वे टेस्टचे वाचन असिफ पटेल यांनी केले.तर स्वागत रोटे संजय माणगावे यांनी

 

केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी रोटरी क्लबच्या वतीने रोटेरियन रुस्तम मुजावर यांनी प्रास्ताविक करीत रोटरीने गेल्या साठ वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला.यानंतर पद्म फाउंडेशनच्या वतीने

 

भरत माणगावे यांनी ट्रस्टची स्थापना व त्यामागील उद्दिष्ट व करीत असलेले कार्याची माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी मोहन पालेशा यांचा व प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला.यानंतर चालू वर्षीचे पुरस्कार प्राप्त शामसुंदरजी मालू यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ मानपत्र

 

देऊन प्रमुख अतिथी श्री मोहन पालेशा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मानपत्राचे वाचन रोटे डॉक्टर सौ.सविता पाटील यांनी केले.यावेळी नातू पियुष अमित मालु यांचे भाषण झाले.यावेळी सत्कारास उत्तर देताना श्यामसुंदर मालू यांनी आजवर केलेल्या कार्याची

 

नोंद रोटरी क्लबने व पद्मा फाउंडेशन यांनी घेतली बद्दल कृतज्ञ व्यक्त करीत कैलासवासी लक्ष्मीनारायण मालू यांच्या पश्चात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत केलेले कार्य सत्कारणी लागले याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी झेप अंकाचे प्रकाशन संपादक रोटे रुस्तुम मुजावर

 

व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रोटरी क्लब जयसिंगपूरच्या सामाजिक उपक्रमास विशेष देणगी व सहकार्य दिल्याबद्दल उद्योगपती वीरेन शहा, उद्योगपती विनोदभाऊ घोडावत,भरत माणगावे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी यांची

 

ओळख इव्हेंट चेअरमन स्वप्निल इंगळे यांनी करून दिली. यानंतर असिस्टंट गव्हर्नर रोटे श्रीकिसन भुतडा यांचे शुभेच्छा भर मनोगत व्यक्त केले.यानंतर रोटरी क्लब डिस्टिक थ्री वन सेवन झिरोचे प्रांतपाल नासीर बोरसदवाला यांनी रोटरी क्लब जयसिंगपूरच्या साठ

 

वर्षाच्या कारकिर्दी बद्दल समाधान व्यक्त करीत रोटरी क्लब जयसिंगपूर यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख अतिथी मोहन पालेशानी आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने सर्वांना मंत्रमुग्ध करी जीवन ना मिले दुबारा या विषयावर व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक जीवन कसे जगावे

 

यावर आपले विचार मांडणी करीत जयसिंगपूर भूषण शामसुंदर मालू यांच्या जीवन कार्याचे हे सकारात्मक कसे राहिले यांचे सर्व उदाहरण माहिती दिल दिली.यावेळी विद्यासागर अडगाने यांनी आभार व्यक्त केले.यावेळी जयसिंगपूर भूषण प्राप्त मान्यवर,उद्योगपती बाबुलालजी मालू ,रमेश इंगळे ,माजी नगराध्यक्ष प्रकाश अण्णा झेले,

 

उद्योगपती विनोद भाऊ घोडावत ,राजेंद्र मालू ,प्रकाश निटवे, खजिनदार गौतम झेले,सुमित पाटील, अजय सागर मगदूम,डॉ वसुंधरा घोडके, सौ अरुणा पाटील, सुमीत पाटील,जानकी राजेंद्र पाटील-भोजकर, राजेश सानीकोप, श्रीकांत घोडके,सचिन शेडबाळे, विजित पाचोरे, अनमोल मगदूम ,बजरंग खामकर, जितेंद्र पाटील- हरोलीकर,

 

सुदर्शन कदम,दत्ता कोळी, सुभाष मालू, कांतीलाल मालु, अमित मालू, संजय मालू ,राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र झेले, दादा पाटील -चिंचवडकर,वीरेन शहा, कनक भाई -शहा, दीपक शहा,महेंद्र बागरेचा ,नटवर मिनियार ,घनशाम मानधना शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

error: Content is protected !!