लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 करिता कृषि विभाग मध्ये क्षारपडमुक्तीचे जनक दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील दादा यांची नामांकनसाठी निवड झाली असून गणपतराव दादांच्या नेतृत्वाखाली क्षारपडमुक्तीसाठी ‘दत्त’ पॅटर्नच्या माध्यमांतून आतापर्यंत सुमारे 15 हजार एकर शेती क्षारपडमुक्तीकडे वाटचाल सुरु आहे.यामध्ये आज रोजी ३८०० एकर शेती क्षारपडमुक्त झाली असून शेतकऱ्यांनी त्यामध्ये ऊस भाजीपाला पिकवण्यास सुरुवात केली आहे.अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दादांनी नेहमीच मदतीचा हात देऊन त्यांना स्वाभिमानाने उभा करण्यासाठी मोलाची मदत आणि सहकार्य केले आहे. आजपर्यंत गणपतराव दादांनी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गेली दोन दशके शेतकऱ्यांसाठी काम केले.आज दादा या पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात पोहोचत आहे.यासाठी आज तुमच्या त्याच सहकार्याची गरज आहे.
https://lmoty.lokmat.com/vote.php
या लिंकवर कृषी विभागात जाऊन गणपतराव आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांना भरभरून मत द्या. शक्य असल्यास आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सुद्धा पाठवा आणि दादांना अजून काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
कृषी विभागात जाऊन ‘गणपतराव आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील’ या नावाला क्लिक केल्यानंतर पानाच्या शेवटी जाऊन आपलं नाव आणि ई-मेल id दिलं तरचं मत नोंदवलं जाईल.