डी.वाय.पाटील’ साखर कारखान्‍यास ‘सर्वोत्‍कृष्‍ट पर्यावरण संवर्धन’ पुरस्‍कार प्रदान

Spread the love

पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे गळीत हंगाम 2022-23 साठी देण्यात येणारा राज्यस्तरीय “कै.किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन” पुरस्काराने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास गौरविण्यात आले.माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते व व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त तेजस सतेज पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन बंडोपंत कोटकर, कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.हा पुरस्कार मिळण्यासाठी ज्या घटकांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे तसेच कारखाना प्रशासन, कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

error: Content is protected !!