सदलगा / प्रतिनिधी
अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी होणार आहे त्या प्रित्यर्थ येथील दत्त मंदिरात राम अक्षता,प्रभू श्रीराम मंदिर प्रतिमा आणि माहितीपत्रक येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामींच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी डॉ.ज्योती चिंचणीकर म्हणाल्या,पाचशे वर्षांपासून राम मंदिर बांधकामासाठी न्यायालयीन लढा सुरू होता.त्याला २०१९ मध्ये न्यायालयात विजय मिळाला आणि समस्त हिंदू समाजाचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्रांचे मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला.
२२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.त्यांच्या राम अक्षता आज सदलग्यात आल्या असून त्यां अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.तेंव्हा अयोध्येत या समारंभाला सर्वांनाच जाणे जमणार नाही.
त्यामुळे घरोघरी आपल्या देवघरात या राम अक्षता ठेवाव्यात आणि जेंव्हा केंव्हा अयोध्येत जाल तेंव्हा तिथे अर्पण कराव्यात अन्यथा त्या दिवशी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक केला जाणार आहे.तिथे त्या अर्पण कराव्यात.तसेच १४ जानेवारी पासून २१ जानेवारी पर्यंत दररोज संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीराम आराधना होणार आहे.
तिथे सर्वांनी यावे असे आवाहनही केले.दरम्यान घरोघरी राम अक्षता वितरण करण्यात आले.२२ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हनुमान मंदीरात दीपोत्सव करण्यात येणार आहे.