नृसिंहवाडी शिरटी रस्त्यासाठी १ कोटी २० लाखाच्या निधीमुळे गैरसोय टळणार

Spread the love

नृसिंहवाडी शिरटी रस्त्यासाठी १ कोटी २० लाखाच्या निधीमुळे गैरसोय टळणार

नृसिंहवाडी मधील नागरिकांनी मानले आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे मानले आभार

शिरटी / प्रतिनिधी

नृसिंहवाडी ता शिरोळ येथील नृसिंहवाडी ते शिरटी हा रस्ता अत्यंत खराब झाला होता.या रस्त्यावरून घालवाड, कुटवाड,कनवाड,हसुर येथील नागरीकांना शिरटी मार्गे नृसिंहवाडीस ये-जा करण्यासाठी नागरीकांना जवळचा

 

रस्ता आहे.मात्र रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अतिशय दयनीय अवस्था असल्याने रस्त्याने प्रवास करणे कठीण जात होते.अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी होती.याची दखल घेऊन आमदार डॉ राजेंद्र पाटील

 

यड्रावकर यांनी ग्रा.मा.२४ या रस्त्यासाठी १ कोटी २० लाख रु मंजुर केले.तसेच प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मोटरसायकल पार्किंग व्यवस्था करणेसाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाल्याने जोशी

 

भोजनालय नजीक क्रॉकिटिकरण आता हा रस्ता चकाचक होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अनेक वर्षांनी का होईनंबन निधी मंजूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे,या

 

रस्त्याचे काम युद्ध पातळीवर होत असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान नृसिंहवाडी शिरटी  रस्त्याचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी अमृत अणुजे,

 

प्रविण अणुजे,गुरुदास खोचरे,परशुराम गवंडी,कृष्णा गवंडी,विकास पुजारी,उदय शिरटीकर,मुकुंद पुजारी, सचिन जाधव, संदिप झळके,आण्णासो सुतार, कुमार

 

रोजे, राहुल चौगुले,विजय चिंचवाडे,सुर्यकांत उदगावे, माजी सरपंच राहुल सुर्यवंशी,नृसिंहवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!