१६ जानेवारीला मा केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार निमशिरगावात

Spread the love

शरद पवार यांच्या हस्ते पी.बी.पाटील सेवा सोसायटीचे उदघाटन निमशिरगांवमध्ये १६ ला दुपारी दोन वाजता शेतकरी मेळावा व जाहिर सभा

निमशिरगाव / प्रतिनिधी

निमशिरगांव (ता. शिरोळ) येथे स्वातंत्र्यसेनानी श्री पी.बी.पाटील निमशिरगांव विकास सोसायटीच्या नुतन इमारत उदघाटन,नामकरण सोहळा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते मंगळवार ता. १६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता होणार आहे.यावेळी स्वातंत्र्यसेनानी पी.बी.पाटील महसूल भवन व बहुद्देशीय सभागृह इमारतीचा पायाखुदाई होणर आहे.यावेळी जाहिर सभा व शेतकरी मेळावा होणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत.अशी माहिती सरपंच सौ.अश्विनी गुरव,अध्यक्ष महावीर पाटील, पद्माकर पाटील यांनी दिली.यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष कलगोंडा पाटील,अनिल पाटील,पंकज पाटील, शैलेश गुरव, उपस्थीत होते.सन १९३३ साली स्थापन झालेल्या विकास सेवा सोसायटीने संस्थेची दुमजली इमारत उभारली आहे.त्याचे उदघाटन तसेच संस्थेचे नामकरण स्वातंत्र्यसेनानी पी.बी.पाटील निमशिरगांव विकास सोसायटी असे करण्याचा कार्यक्रम येणार आहे. तसेच ग्रामपंचायच व ग्रामस्थांनी नियोजित केलेल्या स्वातंत्र्यसेनानी साहित्यिक स्व.पी.बी.पाटील भवन व बहुद्देशीय सभागृह इमारतीचे पायाखुदाई नामदार श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.त्यानंतर भव्य शेतकरी मेळावा होणार आहे.यावेळी साहित्यिक कृष्णात खोत, डॉ.अमोल पाटील,आप्पासाहेब घाटगे यांच सन्मान करण्यात येणार आहे.कार्यमास खासदार धैर्यशील माने,मा खा राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील,प्रकाश आवाडे,सतेज पाटील,उल्हास पाटील,उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तर अतिथी म्हणून व्ही.बी.पाटील,जवाहरभाई शाह, डॉ.अनिल पाटील,अनिल बागणे,राजेंद्र खानविलकर, अनिलराव यादव,डॉ.राजेंद्र कुंभार,सावकर मादनाईक, राजवर्धन नाईक निंबाळकर,पद्माकर पाटील आहेत.

error: Content is protected !!