मंदिरांच्या उभारणीतून मुश्रीफांनी अध्यात्मिक चळवळीला बळ दिले – डॉ.संजय पंतबाळेकुंद्री

Spread the love

कौलगे / प्रतिनिधी

समाजामध्ये चांगुलपणा वाढविण्यासाठी अध्यात्मिक चळवळीची गरज आहे.याची जाणीव असणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेकडो मंदिरांच्या उभारणीतून अध्यात्मक चळवळ वाढीस लावली आहे. असे गौरवोद्गार पंतबाळेकुंद्री संस्थानचे अध्यक्ष डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांनी काढले.

कौलगे ता.कागल येथे ग्रामस्थांची लोकवर्गणी व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून बांधलेल्या श्री. दत्तपंत मंदिर वास्तुशांती,कलाशारोहण व श्री दत्तगुरु महोत्सव सोहळा या संयुक्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ईश्वरा पाटील होते.

 

डॉ. पंतबाळेकुंद्री पुढे म्हणाले,नामदार मुश्रीफ यांची आठवण करूनच भाविक मंदिरात प्रवेश करतात. भाविक भक्त संप्रदाय आणि समाज एकसंध राहावा, यासाठी ना.मुश्रीफ यांच्याकडून हजारो कामे सुरू आहेत. नागरिकांसाठी सुख सोयी विनासायास आणि सहज उपलब्ध करत आहेत.या कामांचा आशिर्वाद त्यांना निश्चितच मिळेल.

 

उर्वरित आयुष्यही जनसेवेसाठीच….!

युवा पिढी निर्व्यसनी व्हावी.याबरोबरच गावकऱ्यांमध्ये एकमेकांप्रती आदर भाव निर्माण होवून सामंजस्य राहावे. या उदात्त हेतूने गावागावात ७००हून अधिक मंदिरांच्या बांधकामासाठी निधी दिला आहे. सर्वांच्या जीवनात चांगले दिवस यावेत.तसेच,माझे उर्वरित आयुष्यही जनसेवेसाठीच समर्पित पडावे,असे मागणे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दत्तपंत महाराज यांच्याकडे केले.

 

यावेळी प. पु.डाँ. संजय पंतबाळेकुंद्री यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रविणसिंह भोसले, माजी सरपंच के. के. पाटील,संजय भोसले, गजेंद्र सातपुते,मयुर आवळेकर, पिंटू पाटील, आनंद पोवार यासह दत्तपंत सांप्रदायाचे परिसरातील भाविक उपस्थित होते.

उपसरपंच अरुण पाटील यांनी स्वागत केले.माजी सरपंच नंदकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंत माने यांनी आभार मानले.

error: Content is protected !!