भैरववाडी मध्ये १५ रोजी भाई अण्णासाहेब डांगे प्रवेशद्वाराचे उद्घाटन

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

 

लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी

 

व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती रमेश भुजूगडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांचे कार्य आदर्शवत असून त्यांच्या कार्याची आठवण राहण्यासाठी भैरववाडी ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून प्रवेशद्वार उभे केले जाणार आहे.

 

लोकनेते भाई अण्णासाहेब डांगे यांनी या परिसरातील गोरगरीब व वंचितांना न्याय देऊन मोठे कार्य केले आहे. त्यांच्यासारखा नेता यापुढे होणार नाही. त्यामुळे त्यांचे कार्य या परिसरातील ग्रामस्थांना आदर्शवत असून त्यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला असून सदरचे प्रवेशद्वार लोकवर्गणीतून करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

या उद्घाटन समारंभास माजी मंत्री विनय कोरे, माजी मंत्री व खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री व आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशिल माने, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर,गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाटगे, दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील, मयूर उद्योग समूहाचे संजय पाटील,

 

वैभव नाईकवडे, सुमित कदम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशिष चौहान आदी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भुजगडे यांनी दिली.यावेळी उमेश कर्नाळे, रामचंद्र डांगे, रणजित डांगे,

 

तेजस कोळेकर, भिमराव यादव, उदय डांगे, सुरेश गावडे, रामचंद्र नरके, मनोहर पवार, केरबा प्रधाने,आप्पासाहेब गावडे, चंद्रकांत कोळेकर यांच्यासह भैरववाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!