ट्रॅक्टर टाॅलीला पाठीमागून टेम्पोची धडक बसून एक ठार तर दोघे जखमी
पुलाची शिरोली / प्रतिनिधी
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बिरदेव मंदिरासमोर ऊसाने भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर टाॅलीला पाठीमागून टेम्पोची धडक बसून एक ठार तर दोघे जखमी झाले मयत व जखमी हे सांगली जिल्ह्यातील असून जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हा अपघात सोमवारी रात्री १० वाजण्यासुमार झाला .
बेंगलोरहून पुणेच्या दिशेने ऊस भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४४ एस ३३३१ व टाॅली क्रमांक एम एच ४४ एस ४४६३ व ४४६४ टोप येथील बिरदेव मंदिराजवळ आले असता पाठीमागून आलेल्या मालवाहक ४०७ टेम्पो क्रमांक एम एच ०९ सी ए ८१३४ ने धडक दिल्याने
भाऊसो नाना लोंढे वय ४३ रा.भडकंबे ता.वाळवा हे ठार झाले, तर शुभम महादेव पोळ व ओंकार सर्जेराव माने दोघेही रा.नागाव ता.वाळवा जि.सांगली हे जखमी झाले चालकाने आपल्या ताब्यातील मालवाहतुक टेम्पो हा रस्त्याकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे बेंगलोर ते पुणे या
दिशेने चालवित जात असताना समोरील बाजूस ऊसाने भरून निघालेला ट्रॅक्टर ट्रॉलीस मागून जोराची धडक देवून अपघात केला,या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.