‘चला डोक्यात दगड भरु’ या आगळ्या वेगळ्या उपक्रम

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

चला डोक्यात दगड भरु या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली येथे करण्यात आले होते.कोल्हापूर येथील प्रा.डॉ.अभिजीत पाटील व प्रा.डॉ.योगिता पाटील यांच्या वैयक्तिक संग्रहातील खडक खनिजे व जीवाश्म यांचे  प्रदर्शन नुकतेच राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली येथे भरवण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरोली गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा कृष्णात करपे या होत्या तसेच माजी उपसरपंच कृष्णात करपे,उद्योजक योगेश खवरे,हिदायत पटेल, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार ग्रामपंचायत सदस्य सौ मनीषा संकपाळ ग्रामपंचायत सदस्य सौ.कमल कौंदाडे, बाजीराव सातपुते,पुरुषोत्तम निकम,महेश दटमजगे, शांतिनाथ कुन्नूरे,शंकर चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री गंगाधरे यांनी केले सूत्रसंचालन ए.पी.चौगुले यांनी केले.प्रदर्शनामध्ये खडकांचे,खनिजांचे,धातु खानिजे,स्पटिके इ विविध प्रकार मांडण्यात आले होते.प्राध्यापक पाटील दापत्य गेली पंधरा वर्ष अशा स्वरूपाचे प्रदर्शन विविध शाळा महाविद्यालयांमध्ये भरवत आहेत.त्यांच्याकडे वैयक्तिक संग्रहात तीन हजार पेक्षा अधिक खडक खनिजांचे नमूने आहेत.अग्निज खडक,स्तरित खडक व रूपांतरित खडकांचे प्रकार विद्यार्थ्यांना या उपक्रम मध्ये पाहता हाताळता आले.महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने सापडणारा काळा पाषाण म्हणजेच बेसाल्ट त्याची निर्मिती त्याचे उपयोग त्याचे प्रकार याबद्दल याप्रसंगी माहिती देण्यात आली.छिद्रयुक्त काळा पाषाण,कुहरी भरीत काळा पाषाण,नळी कुहरी भरीत काळा पाषाण,दोरखंड पाषाण,गुरुस्पटी पाषाण,महागुरूस्पटी पाषाण,पाषाणातील स्तंभी रचना,या प्रकारच्या आपल्या सभोवतालच्या असणार्या भूशास्त्रचा त्यामुळे तयार झालेल्या भूरूपांचा पर्यावरणाशी असणारा सहसंबंध निसर्गत असणारे खडक चक्राचे महत्व याबद्दल सांगण्यात आले.खडक व खनिजे यांचा पुस्तकी अभ्यासक्रमामध्ये समावेश भूगोल,विज्ञान आणि पर्यावरण या विषयांतर्गत झालेला असतो पण प्रात्यक्षिकासाठी क्वचितच हे नमुने विद्यार्थ्यांना पहावयास,प्रयोग करावयास,निरीक्षण किंवा हाताळण्यास मिळतात.विद्यार्थ्यांनी जनसामान्यांनी खडक खनिजांचे प्रकार पाहावे त्याचे गुणधर्म अभ्यासावेत त्याची वैशिष्ट्ये जाणून घ्यावीत याबद्दल या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने सापडणारा काळा पाषाण म्हणजेच बेसाल्ट त्याची निर्मिती,त्याचे उपयोग,त्याचे प्रकार,किल्ले आणि मंदिरे या मध्ये वापरलेला बसाल्ट याबद्दल याप्रसंगी प्रा पाटील यांचे कडून माहिती देण्यात आली.प्राध्यापक डॉ अभिजीत पाटील हे कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये भूशास्त्र विषयाचे अध्यापन करतात तर प्रा डॉ योगिता पाटील या कोल्हापूर येथील गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयांमध्ये भूशास्त्र विषयाचे अध्यापन करतात.
error: Content is protected !!