पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी डी टी एड बी एड स्डुडंट असोसिएशनच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे.पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था सह बिगर इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याबाबतचे पत्रक तात्काळ रद्द करून गुणवत्तेनुसार शिक्षक भरती करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.तसेच त्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कोंढरे,असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.