केंद्र आणि राज्यातील सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाला काय मिळालं याचा त्यांनी विचार करावा? सत्तेसोबत गेलेल्या 40 आमदारांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. ते पुन्हा निवडून येऊ शकतील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.मात्र ते सत्ता मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आहेत.हे कशासाठी असा प्रश्न पडायला हवा,येणाऱ्या निवडणुकीत राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवेल असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.