शिरोळमधील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मनसेची मागणी

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी –
शिरोळ शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून नागरिकांना व लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत तसेच पहाटे व सायंकाळी फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक,महिला व अंगणात खेळणारे लहान मुलांवर हल्ले होण्याचे प्रमाण
वाढले आहे, मात्र या बाबींकडे शिरोळ पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून येत्या चार दिवसात भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पालिकेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नगरपालिकेच्या वतीने याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास ही कुत्री कुठलीही पूर्व सूचना न देता पालिका प्रशासन अधिकारी यांच्या दालनात आणून सोडून मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी मनसे शिरोळ तालुका उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी मनसे,महिला शिरोळ शहर अध्यक्षा प्रियांका नाईक, रमेश शिंगाडे, उत्तम कोळी, शिरोळ शहर अध्यक्ष महेश माने, उपाध्यक्ष राहुल धुमाळे, जयश्री पाटील आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!