बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा जयघोषात हरोली येथून श्री क्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडी रवाना

Spread the love

हरोली येथून श्रीक्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडी रवाना

बाळूमामाच्या नावानं चांगभलंचा  जयघोष ;  वाद्यवृंदासह अबालवृद्ध  दिंडीत सहभागी
शिरोळ /  प्रतिनिधी
हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांच्या पुढाकारातून हरोली (ता.शिरोळ)येथून सकाळी श्रीक्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडी रवाना झाली.बाळूमामाच्या नावानं चांगभलं…असा जयघोष करीत वारकरी व भक्तगण वाद्यवृंदासह दिंडीत सहभागी
झाले. हरोली येथील श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर ट्रस्ट व श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी सांप्रदायिक मंडळ यांच्या वतीने सद्गुरू संत बाळूमामा मंदिरात सकाळी हरिभक्त गुरुवर्य श्री बिरदेव विठ्ठल माने महाराज यांनी पूजा – अर्चा केली.त्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत
 मंदिरापासून श्रीक्षेत्र आदमापूरला बाळुमांमाची पायी दिंडीचा शुभारंभ शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी डॉ दगडू माने यांनी वारकरी संप्रदाय व भक्तगणांना दिंडी सोहळ्यास शुभेच्छा
दिल्या.श्री क्षेत्र हरोली येथून मार्गस्थ झालेली सद्गुरू संत बाळूमामा ची दिंडी कबनूर,पट्टणकोडोली,कोगनोळी मार्गे श्रीक्षेत्र आदमापूर येथे पोचणार आहे.पायी दिंडीतील मुक्कामस्थळी कीर्तन,भजन,प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.दरम्यान,दिंडी परती निमित हरोली येथे गुरुवारी दि.११ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता महाआरती व महाप्रसाद होणार आहे.
error: Content is protected !!