नृसिंहवाडी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी जितेंद्र आणुजे

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

प्रेस क्लब नृसिंहवाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी जितेंद्र आणुजे (दै. सकाळ) यांची तर उपाध्यक्ष म्हणून अरुण गावडे (दै. नवा महाराष्ट्र) व सचिव म्हणून संजय पुजारी (दै. महासत्ता) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी (दै.पुढारी) होते.

 

यावेळी बोलताना आणुजे म्हणाले, “अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.पत्रकारांचे हित जोपासण्यासाठी सर्व पत्रकार कार्यरत राहू.यावेळी मावळते अध्यक्ष प्रशांत कोडणीकर (दै. लोकमत) यांचा सत्कार करण्यात आला.

 

कार्यकारिणी सदस्य रवींद्र केसरकर (दै.तरुण भारत), विजय सूर्यवंशी (दै.पुण्यनगरी),रमेश सुतार (बी न्यूज), दर्शन वडेर (द नृसिंहवाडी टाईम्स) उपस्थित होते.

error: Content is protected !!