जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कुटवाड येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर

Spread the love

जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कुटवाड येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरास सुरुवात
विद्यार्थ्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून झाडांना आळी तयार केली

शिरोळ / प्रतिनिधी

येथील दत्त शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने कुटवाड (ता शिरोळ) येथे दिनांक १ जानेवारी२०२४ पासून राष्ट्रीय सेवा योजना+२ स्तर निवासी शिबिर सुरू करण्यात आले.

 

असून या कालावधीत ग्रामस्वच्छता वृक्ष संवर्धन नव मतदार नोंदणी अभियान लसीकरण जनजागृती असे उपक्रम होत आहेत.गुरुवारी श्रमसंस्कार शिबिरातील स्वयंसेवकांनी दलित समाज स्मशानभूमी परिसर स्वच्छता करून तेथील वृक्षांच्या सभोवताली आळी तयार केली.

 

तसेच दैनंदिन योगा व्यायाम श्रमदान बौद्धिक चर्चा बौद्धिक व्याख्यान असे कार्यक्रम होत आहेत या निमित्ताने विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे.या शिबिरासाठी श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन एम.डी.कळेकर जनता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ एन .एम. केळकर यांचे मार्गदर्शन होत आहे.

 

तसेच कुटवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रेश्मा कांबळे ,उपसरपंच संदीप कोळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी खोत, वत्सला पाटील,अंजली कोळी,भाग्यश्री जाधव,विजय पाटील, बाबासो कांबळे,ग्रामसेवक जमीर आरकाटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळ

 

आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळत असून श्रमसंस्कार शिबिरादरम्यान विद्यार्थी करत असलेल्या कार्याचे सर्वांच्याकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!