कवी दर्शन वडेर याची ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निवड

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

येथील कवी दर्शन रमेश वडेर याची अमळनेर, जळगाव येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून निवड झाली आहे. निवडीचे पत्र साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे व डॉ. अविनाश जोशी यांनी पाठवले आहे. अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाने यंदाच्या संमेलनाचे आयोजन केले आहे.

येत्या २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी डॉ.रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन प्रताप महाविद्यालयात संपन्न होणार आहे. अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी असल्याने त्यांच्या १२५ व्या जयंतीचे यंदा औचित्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असून राज्यभरातून साहित्यिकांची मांदियाळी असणार आहे.दर्शन वडेर याचे काव्य सादरीकरण कविकट्टा मंचावर होणार असून सन्मानपत्र दिले जाणार आहे. नृसिंहवाडीतून प्रथमच अ.भा. साहित्य संमेलनात हा सहभाग असून परिसरातून दर्शनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!