कागल श्री राम मंदीरातील लोकोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण

Spread the love

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे पहिले निमंत्रण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समरजित घाटगे यांनी दिले.यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कागलमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या लोकोत्सवाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.या मंदिर उभारणीसाठी स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी दिलेले योगदान हे समस्त राम भक्तांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी काढले.कागल आणि आसपासच्या भाविकांसाठी कागल येथील श्रीराम मंदिरामध्ये २०,२१ व २२ जानेवारी रोजी या लोकोत्सवाचे आयोजन केले आहे. या लोकोत्सवाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांवरील विविध कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

error: Content is protected !!