ऊस बिलातुन शेअर्स वाढीची रक्कम वसुलीस आंदोलन अंकुशचा विरोध – धनाजी चुडमुंगे 

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी
सभासद शेअर्स रक्कम 10 हजार वरून 15 हजार करण्याच्या ठरावाला सभासदांचा विरोध असताना कारखाण्याने बळजबरीने ठराव करून याअगोदर सभासद विरोधी काम केले आहेच पण सभासदांच्या संमतीने वाढीव 5 हजार रुपये ऊस बिलातुन वसुल करेल अशी पोट नियमात कारखाण्याने दुरुस्ती केली असताना शेतकऱ्यांच्या संमती शिवाय ऊस बिलातुन 5 हजार रुपये वसुल केले जात आहेत.त्याला आमचा विरोध आहे असं निवेदन आज शिरोळ दत्त साखर कारखाण्याला आंदोलन अंकुशच्या वतीने देण्यात आले.साखर कारखाना वाढीव शेअर्स रक्कम ऊस बिलातुन वसुल करत आहे. चालू हंगामाच्या पहिल्या पंढरवड्याच्या ऊस बिलातुन कारखाण्याने 5 हजार रुपये प्रति शेअर प्रमाणे पैसे वसुल केले आहेत.निसर्गाच्या अवकृपेमुळे उसाचे उत्पादन घटले आहे त्यात कारखाण्याने 400 रुपये कमी दर दिल्याने शेतकऱ्यांचे येणाऱ्या ऊस बिलातुन पीक कर्ज पण भागणार नाही अशा अडचणीच्या काळात त्याला न विचारता परस्पर ऊस बिलातुन रक्कम कपात करणे माणुसकीला धरून नाही शेतकऱ्यांच्या संमती शिवाय कपात केलेली रक्कम तात्काळ परत करा आणि यापुढे कोणाच्याशी ऊस बिलातुन कपात करू नका अशी विनंती करण्यात आली.उद्या पर्यंत कपात केलेले पैसे परत करतो असे जाहीर न केल्यास कारखाण्याच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे.यावेळी संचालक मंडळासमोर हा विषय मांडतो आणि तुम्हाला कळवतो असे आश्वासन कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी दिले.यावेळी तालुकाध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष संभाजी शिंदे,मंगेश घाटगे,आप्पा कदम,दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगावे,रशीद मुल्ला,अभिजित पाटील, सुधाकर उदगावे व शेतकरी उपस्थित होते.
संचालक एम डी गेटवर
आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी कारखाण्यावर एकत्र येत आहेत हे पाहून कारखाण्याचे पाच सहा संचालक आणि कारखाना समर्थक स्वतः कारखाना गेटवर आले.कार्यकर्त्यांनी ऑफिस मध्ये जाऊन चर्चा करू या म्हंटले तरी त्याकडे दुर्लक्ष करून इथेच निवेदन द्या म्हणून कार्यकारी संचालक यांनी हट्ट केला शेवटी गेटवरच चर्चा करून संचालक एम डी यांनी निवेदन स्वीकारले.विश्वस्त म्हणून बसलेल्या चेअरमन आणि संचालक यांची ही वागणूक सभासदांचा अपमान करणारी असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
चेअरमन चर्चेला न आल्याने कार्यकर्ते संतप्त
चेअरमन कारखाना ऑफिस मध्ये हजर होते तर ते आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला घाबरत आहेत का?असा सवाल धनाजी चुडमुंगे यांनी कार्यकारी संचालकांना केला असता बोर्ड मिटिंग आहे त्यामुळे ते कामात आहेत असं एम डी यांनी उत्तर दिले पण काही मिनिटातच चेअरमन आपल्या गाडीतून गेटवरूनच घराकडे गेल्याने कार्यकर्ते खोटं बोलणाऱ्या कार्यकारी संचालक यांच्यावर संतप्त झाले होते.
error: Content is protected !!