शरद इन्स्टिट्युटच्या दोन संशोधन प्रकल्पांची आंतर विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड

Spread the love

यड्राव / प्रतिनिधी

यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ दोन संशोधन प्रकाल्पांची अविष्कार २०२३ च्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच महाविद्यालयाला कृषि श्रेणीत विजेतेपद तर जनरल चॅम्पीयनशीपची उपविजेतेची ट्रॉफी मिळाली आहे.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे येथे ‘अविष्कार २०२३’ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत राज्यभरातून पदवी व पदव्यत्तर महाविद्यालयातून १५० पेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते.

 

यामध्ये पदव्युत्तर विभागात तेजस्विनी दानवाडकर (एम.टेक., आर्टिफिशल इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स) हिने टोमॅटो प्लॉट लीफ डिसीस डिटेक्शन युजिंग सीएनएन गाईड संशोधन प्रकल्प सादर केला. ह्या प्रकल्पाला कृषी श्रेणीत प्रथम क्रमांक मिळाले.

 

प्रकल्पासाठी डॉ. एस.टी. जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील समीर मोमीन याच्या  डेव्हलपमेंट ऑफ स्मार्ट अल्गीबायो पॅनल अॅण्ड इटस ग्रोथ फोरकास्टींग युजिंग मशिन लर्निंग या प्रकल्पाला कृषी श्रेणीत व्दितीय क्रमांक मिळला.

 

प्रा. एएसएन हुसेनी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाने कृषी श्रेणीत विजेतेपद पटकावले असून जनरल चॅम्पीयनशीपमध्ये उपविजेता ठरले आहे.

 

हे दोन्ही संशोधन प्रकल्पांची नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात १२ ते १५ जानेवारी रोजी होणा-या आंतर विद्यापीठीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

विद्यार्थ्यामध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात आविष्कार-महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरु केले आहे. यामध्ये शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी यश संपादन करीत आले आहेत.

 

अविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉ. शरद जाधव, प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डिन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांचे सहकार्य लाभले.

 

संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!