राजापूर येथे विद्यार्थी देणार नवे शेतीविषयक तंत्रज्ञान ; विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या शेतीविषयक संवाद

Spread the love

राजापूरमध्ये शरद कृषि महाविद्यालयाच्या कृषिदुतांचे प्रशिक्षण

शिरोळ / प्रतिनिधी

जैनापूर ( ता शिरोळ ) येथील शरद कृषि महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार राजापूर गावात कृषिदुत म्हणून प्रशिक्षणासाठी दाखल झाले असुन राजापूर ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

दरम्यान, कृषी विषयक प्रशिक्षणामध्ये चार महिने कृषीदूत कार्यतत्पर राहणार आहेत. प्रयोगशील शेती व त्यामधील तंत्र समजून घेत प्रशिक्षणार्थी कृषिदूत अभ्यासपूर्ण माहिती घेणार आहेत.

 

राजापूर या भागातील शेती शेतकरी व प्रयोगशील शेती विषयी कामाची माहिती घेत नवे तंत्रज्ञान अभ्यासणार आहेत. त्यामध्ये हे कृषिदुत शेतीविषयक माहीती, कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करणे, त्याशिवाय शेतकऱ्यांना माहितीपर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. या प्रशिक्षणातून विद्यार्थी घेणार नवे शेतीविषयक तंत्रज्ञान घेणार आहेत.

 

यानिमित्ताने विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या शेतीविषयक संवाद सुरु झाला आहे.यावेळी सरपंच गीता धुळाप्पा दिवटे , उपसरपंच जावेद जमादार, ग्रामसेवक एस. व्ही. धुपदाळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भेटी दरम्यान कृषिदुतांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.यावेळी कृषिदुत प्रतिक भूयेकर,

 

ओंकार चव्हाण खोत, दिगंबर इंगळे, स्वप्निल जाधव, इंद्रनील एडके, हर्षद खिलारे उपस्थित होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील , उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.टी कोळी व प्रोग्रॅम अधिकारी प्रा. ए.एस माळी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

error: Content is protected !!