राजर्षी शाहू नगर वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी :

येथील राजश्री शाहू नगर वाचन मंदिर येथे क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सामाजिक कार्यकर्ते अजित चुडमुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या

 

अध्यक्षस्थानी शाहू वाचनालयाचे कार्यवाह धनाजीराव जाधव हे होते. पञकार चंद्रकांत भाट वाचनालयाचे संचालक चंद्रकांत माने गावडे प्रगतशील शेतकरी अमोल पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन

 

करण्यात आले. यावेळी वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल सौ रुपाली कुंभार लिपिक बाबुराव मोरे विजय धनगर वाचक चंद्रकांत पाटील रुद्राप्पा मडिवाळ गणेश काबंळे आणि अभ्यासिकेतील विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!