‘धक्कादायक’ कचराकुंडीत जिवंत अर्भक सापडलं, जिल्ह्यात उडाली खळबळ 

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील एका पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडल्याची खळबळजनक घटना समोर
आली आहे.आज सकाळी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे अर्भक कचऱ्यात सापडलं,या अर्भकला सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथे श्रीराम सेवा संस्थेचे
पेट्रोल पंपाच्या समोर कचरा कोंडाळ असून आज सकाळी सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येथे आले होते.कचऱ्यात लहान मुलाचा रडचताना आवाज कर्मचाऱ्यांना आला. मात्र एखादी खेळणी आहे,असे समजून स्वच्छता
कर्मचारी कचरा गोळा करण्यात व्यस्त झाले.मात्र पुन्हा मुलाचा रडतानाचा आवाज आल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले.यावेळी कचऱ्यामध्ये एका कापडात गुंडाळून एक दिवसाच स्त्री जातीचे अर्भक
टाकलेले निदर्शनास आले.यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली.तसेच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.  याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ पुढील तपास सुरू केला आहे.
error: Content is protected !!