“द-दुधाचा…नाही दारूचा” हा कार्यक्रमाने नवं वर्षाचे स्वागत

Spread the love
शिरोळ नगरपरिषद शिरोळ,शिरोळ तालुका पुरोगामी मंच आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती शिरोळ तालुका यांचे वतीने रविवार दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौक येथे लोकप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.2024 नूतन वर्ष स्वागतासाठी
 ” द- दुधाचा…नाही दारूचा “हा विशेष कार्यक्रम होत असून नवीन वर्षाचे स्वागत  दारू नव्हे तर दूध पिऊन करूया….विवेकाने आनंदाने व विज्ञानाच्या प्रकाशाने करूया….आणि आपल्या महामानवाच्या विचाराचा जागर करूया. यावेळी “चमत्काराची दुनिया” हा अंधश्रद्धा निर्मुलनाचे प्रयोग आणि प्रबोधनपर कार्यक्रमही सादर होणार आहेत.या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!