अचानक वातावरणात झालेल्या बदलांमुळे साथीचे आजार वाढण्याची शक्यता जास्त असते. ताप , सर्दी, खोकला ,जुलाब ,उलटी असे अनेक आजार साथीचे आजार बळावतात. याबरोबरच अंगदुखी ; डोकेदुखी ; उत्साह नसल्यासारखे वाटणे अशी लक्षणें सुद्धा प्रमुख्याने आढळून येतात. अचानक झालेला हा वातावरणातील बदल आरोग्याला बाधक ठरतो. या लक्षणांवर / आजारावर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळावण्याची शक्यता जास्त असते.
हिवाळ्यात हवा थंड व कोरडी असल्यामुळे हवेत धूळ अधिक प्रमाणात असते. या धुळीच्या माध्यमातून प्रामुख्याने श्वासनाचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. यात मुख्यत्वे दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमन होण्याच्या काळात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
पहाटेच्या थंड हवेत फिरल्याने ;
शितपेये – थंड पाणी पिल्याने ,
थंड पाण्याने अंघोळ केल्याने दम्याचा जास्त त्रास होऊ शकतो.
बदलत्या वातावरणाचा परिणाम लहान मुले व वयोवृद्ध मंडळीमध्ये अधिक दिसतो.त्यामुळे या काळात घरातील लहानग्यांची व वयोवृद्धाची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.ऑक्टोबर ते जानेवारी हा दसरा दिवाळी ख्रिसमस नववर्ष संक्रांत असा सणं उत्सवांचा काळ असल्याने त्यात होणाऱ्या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण ही याच काळात होते.यामूळेही श्वासनासंबंधी समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात.
काय काळजी घ्यावी –
थंड हवेत फिरायला जाणे टाळावे.
शितपेय – आइस्क्रीम – थंड पदार्थ खाऊ नयेत.
थंड पाण्याने अंघोळ करू नये. त्याऐवजी कोमट वा गरम पाण्याचा वापर करावा.
आजारी व्यक्तीने खोकताना शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा कारण त्यामुळे नाकातील / तोंडातील निघणाऱ्या स्त्रावातुन निघणारे विषाणू हवेत पसरतात त्यामुळे एकापासून दुसऱ्याला आजाराचा प्रसार / संसर्ग वाढत जातो. अशा व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे.
वारंवार हात धुतले पाहिजेत.
मास्कचा वापर करावा.
आहारात ताज्या व पोषक अन्नाचे सेवन करावे.
सुकमेवा ; फळे, हिरव्या पालेभाज्या , अंडी , चिकन – मटण – मासे याचाही आहारात समावेश करावा. वातावरण जरी थंड असले तरी कोमट पाणी भरपूर प्यावे.
विश्रांती व झोप पुरेशी घ्यावी.
आजाराची लक्षणें तीव्र वाटू लागल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेऊन / तपासणी करूनच औषधोपचार घ्यावेत.
डॉ अतुल शिवाजी पाटील (बालरोगतज्ञ)
मातोश्री चाईल्ड क्लिनिक शिरोळ
संपर्क क्रमांक – 8180914599