बसचा भीषण अपघात ; अनेक विद्यार्थी जखमी

Spread the love

शेडशाळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी बसमध्ये अडकून अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान जखमीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.कुरुंदवाड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लागत असलेल्या चरीमध्ये गेल्याची घटनास्थळावरून समजले दरम्यान,बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी अडकले व अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे घटनास्थळावरून समजते. दरम्यान सदरची घटना समजतात कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

error: Content is protected !!