‘कोण मारणार बाजी’ सदलगा नगरपालिका निकालाकडे कर्नाटक राज्याचे लक्ष

Spread the love

सदलगा नगरपालिका पोटनिवडणूक; चुरशीने ८६ टक्के मतदान

सदलगा / प्रतिनिधी
सदलगा नगरपालिका प्रभाग क्रमांक ५, १२, १५ आणि १६ लागलेल्या पोट निवडणुकीसाठी चुरशीने ८६ टक्के मतदान झाले.एकूण ९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे.प्रभाग क्र. ५ मध्ये अताउल्लाह मुजावर, मोहसीन सनदी,हुसेन मकानदार, प्रभाग क्र १२ मध्ये बसवराज गुंडकल्ले,महांतेश देसाई,प्रभाग क्र १५ मध्ये रिहाना सदनी,करिष्मा मुजावर, प्रभाग क्र १६ मध्ये शकुंतला कुंभार,रजीया जमादार असे उमेदवार आपले भविष्य आजमावित आहेत. प्रभाग क्र ५ मध्ये ८४.६० टक्के, प्रभाग क्र १२ मध्ये ९०.४८ टक्के, प्रभाग क्र १५ मध्ये ८४.४८ टक्के तर प्रभाग क्र १६ मध्ये ८४.२६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्रई आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश पुजेरी यांनी दिली.३० डिसेंबर रोजी चिकोडी येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
error: Content is protected !!