कुरुंदवाड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदी जमीर पठाण तर उपाध्यक्षपदी राजगोंडा पाटील

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

येथील शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री.जमीर पठाण(दै. पुढारी),उपाध्यक्षपदी श्री.राजगोंड पाटील(दै.जनमत) तर सचिवपदी श्री.तुकाराम पवार (दै.महासत्ता) यांची निवड करण्यात आली.येथील श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक बोलविण्यात आली होती.अध्यक्षस्थानी तरुण भारतचे पत्रकार रवींद्र केसरकर होते.सभेच्या प्रारंभी दिवंगत आमदार प्रा.शरद पाटील,सांगली,मिरज,कुपवाडचे माजी महापौर विवेक कांबळे व ज्ञात अज्ञात मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचा वार्षिक लेखा-जोखा अध्यक्ष पठाण यांनी मांडला. अध्यक्षपदी पठाण यांची फेरनिवड करावी असे बाबासो मोरे यांनी सुचवले तर त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी राजगोंड पाटील आणि सचिवपदी तुकाराम पवार यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर अध्यक्ष पठाण म्हणाले पत्रकार संघाची एकजूट असल्याने समाजातील विविध विषयावर वर्षभरात प्रकाशझोत टाकून न्याय देण्याच काम पत्रकारांनी केले आहे.हीच एकजूट घट्ट ठेवून सर्व पत्रकारांना सोबत घेऊन समाजातील नागरिकांच्या हिताचे वृत्त प्रसिद्ध करून पत्रकारितेचा मान उंचावण्याचा प्रयत्न राहील.यावेळी जेष्ठ पत्रकार बाबासाहेब मोरे,अनिल केरीपाळे(दै. सकाळ) रमेश सुतार(बी.न्यूज) ,सतीश पाटील(एस न्यूज)नंदकुमार सुतार(दै. केसरी) सुरेश कांबळे (दै.नवराष्ट्र),आनंदा शिंगे (दै.पुण्यनगरी), इजाजखान पठाण(दै. महान कार्य) उत्तम भोई (राष्ट्रगीत) आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!