सदलगा नगरपालिकेच्या पोट‌ निवडणूकीत ६०% मतदान पूर्ण

Spread the love
सदलगा नगरपालिकेच्या पोट‌ निवडणूकीत ६० % पुढे मतदान पूर्ण
सदलगा / प्रतिनिधी अण्णासाहेब कदम
बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सदलगा नगरपालिकेतील वार्ड क्रमांक 5,12, 15 व 16 या प्रभागाची आज सकाळी निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरळीत सुरू झाली.प्रारंभी सकाळी थंडी असल्याने मतदान केंद्रावर संख्या कमी पहायला मिळाली, दहाच्या पुढे मतदान प्रक्रियेला चांगली गती मिळाली आणि दुपारपर्यंत सर्व केंद्रातील मतदान प्रक्रिया 60 टक्के पर्यंत पूर्ण झाली. सर्वसामान्य जनतेमध्ये निवडणुकी संदर्भात फारसा उत्साह दिसला नसला तरी सर्व मतदारांना मतदानासाठी आणण्याची प्रक्रिया मात्र मोठ्या जोमाने युवा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.सदलगा शहरातील वार्ड क्रमांक 12 मध्ये थोडीशी चुरशीची गर्दी दिसत होती.आणि शहरातील सर्व राजकीय मंडळींनी येथे हजेरी लावलेली दिसली.उर्वरित वार्डामध्ये फारसी गर्दी झालेली दिसत नव्हती.
error: Content is protected !!