राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेसाठी वेदांत गावडे याची निवड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाचा मलखांब खेळाडू वेदांत अनिल गावडे याची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल वेदांत याचे सर्वत्र कौतुक होत आहे.कोल्हापूर विभागीय शासकीय मलखांब स्पर्धा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे झाली या स्पर्धेत वेदांत गावडे याने उल्लेखनीय यश मिळवले त्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.वेदांत गावडे यास श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील कार्यकारी संचालक व दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष एम.व्ही.पाटील,सचिव निलेश पाटील यांच्यासह पदाधिकारी सदस्य प्रशिक्षक संजय देबाजे,वडील अनिल गावडे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.

error: Content is protected !!