खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी
शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिरोळ (जि .कोल्हापूर) येथे दि. 20/10/2020 रोजी किरकोळ भांडणाचा राग मनात धरून झालेल्या हनामारीची फिर्याद शिरोळ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 328/2020 नुसार सागर पाटील,जगदीश पाटील व नीलकंठ मोरे यांच्यावर भा. द. वी. स. कलम 307,452,324,504,506,34 खाली गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर खटल्याची सुनावणी मे.सत्र न्यायाधीशसो जयसिंगपूर यांचे कोर्टात झाली.या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे साक्षीदार व पुराव्यांची तपासणी झाली.आरोपींच्या वतीने ॲड.गुरुनाथ माने यांनी जोरदार युक्तिवाद केला.ॲड.गुरुनाथ माने यांचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.सत्र न्यायाधीशसो श्री.जी.बी.गुरव यांनी या खटल्यातील तीनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.सदर खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. गुरुनाथ दिनकरराव माने व ॲड.ऋषीकेश देवाप्पा गावडे दानोळी यांनी काम पाहिले.
error: Content is protected !!