शिरोळ / प्रतिनिधी
जलजीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिद्धीकरता तालुका स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दिनांक २१ डिसेंबर २०२३ इ.रोजी शिरोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते.सदर वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन पंचायत समिती शिरोळचे गटविकासअधिकारी शंकर कवितके सहायक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे व नारायण पाटील यांच्या उपस्थित करण्यात आले.सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी,विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.वक्तृत्व स्पर्धेचे मूल्यांकन तज्ञ परीक्षकांद्वारे करण्यात आले.यशस्वी सहभागी स्पर्धकांना गटविकास अधिकारी शंकर कवितके व गट शिक्षण अधिकारी भारती कोळी व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.सदर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती शिरोळ मधील कार्यरत विषय तज्ञ व विशेष शिक्षक तसेच पाणी व स्वच्छता विभाग बीआरसी कडील कार्यरत उदय शिंदे व सपना सावंत यांच्यावतीने करण्यात आले होते.