प्राथमिक व माध्यमिक प्रशाला विलासनगर मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Spread the love
प्राथमिक व माध्यमिक प्रशाला विलासनगर मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक व माध्यमिक  विद्यालय विलास नगर या प्रशालेमध्ये प्रत्येक वर्षी प्रमाणे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालय धड्याचे वडगाव प्रशालेचे मुख्याध्यापक केदारी मगदूम हे उपस्थित होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केदारी मगदूम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.तसेच सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून रोपट्यास पाणी घालून करण्यात आ‌ले.या विज्ञान प्रदर्शनाची माहिती प्राथमिक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डोईफोडे यांनी दिली.तसेच मान्यवर व शाळेतील शिक्षक वृंदांना विद्यार्थ्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगाची पाहणी केली . केदारी मगदूम विद्यार्थ्यांना शाब्बासकी देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी संकल्पनेतून या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वयं स्फूर्तीतून व शिक्षक पालकांच्या सहकार्यातून नवनवीन प्रयोग यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी सुंदर रित्या करून दाखविले त्यातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून तसेच विज्ञानातील साहित्याचे ओळख आणि संवाद कौशल्यची ओळख झाली.या विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन प्राथमिक व माध्यमिक विभागाचे अध्यक्ष व मार्गदर्शक अमित मोरे प्रियंका सातपुते व प्राथमिक विभागाचे अध्यक्ष अभिजीत जाधव यांनी केले होते.या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजकांना प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सी पी वाकरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सदर विज्ञान प्रदर्शनाचे रूपरेखा संस्थेचे संस्थापक एस एन पाटील यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले.
error: Content is protected !!