‘ब्रेकिंग’आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

Spread the love

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची घटना कोल्हापुरातील रजपूत वाडी इथं घडली आहे. या अपघातात मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक रविराज जाधव यांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र दोन वाहनांचे मोठं नुकसान झालं आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा आज कोल्हापूर दौरा होता गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आटपून त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं यानंतर ते वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा देवाच्या दर्शनाला जात होते दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर राजपूतवाडी जवळ त्यांच्या ताब्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळली यानंतर मंत्री सामंत दुसऱ्या वाहनातून ज्योतिबा मंदिराकडे रवाना झाले आहे दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.

error: Content is protected !!