‘यांच्या’ आठवणीने पालकमंत्री मुश्रीफही झाले भावनिक

Spread the love
आता मंत्री मुश्रीफ यांची बानगेत पहिली आरती आणि ओवाळणी होणार नाही…!
तुमच्यामुळेच मी तिच्या सावलीत सुखाचे चार घास खात होतो..!
हृदयविकाराने पत्नीचा मृत्यू झालेल्या बानगेच्या पांडुरंग चौगुले यांची भावना
बानगे / प्रतिनिधी
मुश्रीफसाहेब,तुमच्यामुळेच मी तिच्या सावलीत होतो.तिच्या हातचे सुखाचे चार घास खात होतो, अशी दर्दभरी व्याकुळतेची आर्त भावना बानगे ता. कागल येथील पांडुरंग चौगुले यांनी रडत- रडतच व्यक्त केली.दोन दिवसांपूर्वीच हृदयविकाराने मृत्यू झालेल्या पत्नी सौ. आक्काताई यांच्या जाण्याने त्यांचा हुंदका आवरत नव्हता.त्यांच्या या व्याकुळतेने पालकमंत्री श्री.मुश्रीफही भावनिक झाले.बानगे गावात कोणताही कार्यक्रम असो की मंत्री हसन मुश्रीफ यांची साधी गावाला भेट असो.सौ. आक्काताई यांची पहिली आरती आणि ओवाळणी नित्याचीच १५ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या सहकार्याने त्यांच्यावर मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये मोठी शस्त्रक्रिया झाली होती.त्यातून त्या खडखडीत ब-याही झाल्या होत्या.दोन दिवसापूर्वी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले सांत्वनासाठी पालकमंत्री श्री.मुश्रीफ बानगे येथे त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केलं.
“भाऊ माझा पाठीराखा..!”
१५ वर्षांपूर्वी हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेल्या सौ. आक्काताई चौगुले यांचे त्यावेळी त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी समुपदेशन केले होते. त्यावेळी अमिताभजीनी सौ.चौगुले यांना विचारले होते, “तुम्ही शेतकरी कुटुंबातून असूनसुद्धा एवढ्या मोठ्या हॉस्पिटलचा खर्च कसा परवडतो?”त्यावेळी सौ.चौगुले यांनी उत्तर दिले होते, “तिकडं कागलमध्ये माझा पाठीराखा भाऊ हसनसाहेब मुश्रीफ हायं.त्यांनच मला मोफत ऑपरेशनसाठी या दवाखान्यात पाठवलय..! असे अभिमानाने सांगायच्या,
error: Content is protected !!