पाठदुखीने हैराण झाल्यात तर करा मग घरीच हे उपाय

Spread the love
वयाच्या ४५ नंतर हि समस्या भारतात कॉमन झाली आहे.कारण ४५ नंतर हाडातील कॅलसिअम कमी पडायला लागते.स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे.
कारणे – चकती झीझने,चकती सरकने, सयाटीका,जास्त श्रम,वातूळलेले पदार्थ खाणे, कुपोषण,उंचीवरून पडणे.
लक्षणे – पाठ खूप दुखणे,काहींना पाठीपासून पायापर्यंत वेदना पसरणे,पायात गोळा येणे, पाठीत चमकणे,चालता न येणे,पायामध्ये मुंग्या येणे,नस दबने.
तपासणी -MRI Spine, XRAY.
अपथ्य (काय खाऊ नये )-
हरभरा,पावटा,वरणा,बटाटा,थंड पाणी, A.C, फॅन,कोल्ड्रिंक,मध,दही,पापड,लोणचे
पथ्य (खावे) दूध,तूप,लोणी,लसूण,नॉनव्हेज, अंडी,दुधीभोपळा,पडवळ,दोडका,खोबरे,गवारी, भेंडी,शेवगा,घेवडा,ढबू मिरची,मूग डाळ,भाकरी, लाल भात,वांगी,पालेभाज्या,मटकी,मसूर कोमट पाणी,राजगिरा लाडू,सुजी,उडदाची खिर, हळीवाची खिर.
आयुर्वेदिक औषधे – त्रयोदशांग गुग्गुळ,रास्नादी गुग्गुळ,दशमूळ काढा,लाक्षादी गुग्गुळ.स्नेहन, स्वेदन, निरुह-अनुवासन बस्ती.
उपाय –
१) गरम महानारायण तेलाने मालिश करणे व दशमूळ काढ्याच्या वाफेने शेक देणे, वाळूचा शेक, पोट्टली चा शेक देणे
२) लसूणयुक्त औषधी दूध(एक ग्लास भर दुधात १० लसूण पाकळ्या घालणे व ते दूध उकळून गाळून घेणे व पिणे )
३) खारीक पावडर,जवस पावडर,डिंक पावडर खाणे.
४) रात्रीस बजरंग लेप / दशांग लेप लावणे व सकाळी कोमट पाण्याने धुणे.
५) एरंडेल तेल १ चमचा दररोज जेवणपूर्वी घेणे.
६) निर्गुण्डी,पारिजातक,एरंडमूळ,शंख भस्म, मुक्ताशुक्ती भस्म,सुंठ यांचे चूर्ण एकत्रित करून दररोज १-१ चमचा, गरम पाण्यातून घेणे.
७) ऐकूप्रेशरची मदत घ्यावी.
८) जास्त भार उचलू नये व वाकून काम करू नये हि गोस्ट कायम स्वरूपी पाळावी.
९) ताडासन,उस्ट्रासन,सेतूबंधासन,भूजंगासन, धनुरासन हे पाच योगाभ्यास नियमित करावेत.
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार निंगनुरे
संपर्क – 9175723404, 7028612340
error: Content is protected !!