दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर १५० पोलिसांचा बंदोबस्त –  उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळंखे

Spread the love
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या ठिकाणी महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा राज्यासह देशभरात भाविक दर्शनासाठी येत असतात उत्सव काळात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उप विभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळंखे व शिरोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी भेट देवून मंदिर परिसराची पाहणी केली.तसेच दत्त जयंतीच्या दिवशी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी १५० ऊन अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर दत्त जयंती उत्सव काळात येणाऱ्या भाविकांनी दर्शन घेऊन पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!