केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिरचे सुयश.

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या “अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धा सर्वत्र उत्साहात सुरु आहेत.चिंचवाड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिर उदगाव शाळेने घवघवीत यश संपादन केले.लहान गटातील खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.५०मीटर धावणेमध्ये अतिक यासीन मुल्लाणी यांने प्रथम क्रमांक पटकावला तर १०० मीटर धावणेमध्ये सार्थक संदीप बंडगर यांने तृतीय क्रमांक मिळविला.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.यशस्वी स्पर्धकांना गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील,अनिल ओमासे,केंद्रप्रमुख यशवंत पेठे, मुख्याध्यापक सुनिल कोळी यांची प्रेरणा तर मार्गदर्शक शिक्षक संजय पाटील, राजू राठोड,अशोक निकम,गणेश कुरे,उज्वला माने,सुरेखा पाटील, प्रिया कोले यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!