दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये आज श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न

Spread the love

दत्तजयंतीनिमित्त नृसिंहवाडी दत्तधाममध्ये आज श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न

नृसिंहवाडी / प्रतिनिधी
आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र नृसिंहवाडी( दत्तधाम)येथे दत्तजंयतीनिमित्त सुरु असलेल्या सप्ताहामध्ये आज मंत्रोपचाराने श्री गणेश याग व मनोबोध यागासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.आज सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर श्री गुरुचरित्रातील दहा ते एकवीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले. साडेदहाच्या नैवैध आरतीनतंर सामुहिक श्री स्वामी समर्थ मंत्र,रामरक्षा, हनुमान चालीसा पठण करण्यात आले.यानतंर याज्ञिकी विभागाकडुन धार्मिक मंत्रोपचाराने हवन युक्त श्री गणेश याग व श्री मनोबोध याग संपन्न झाला.सेवा मार्गाच्या अठरा विभागापैकी एक असलेल्या गर्भसंस्कार व बाल संस्कार या विषयावर तज्ञ ताईने मार्गदर्शन केले.दुपारच्या सत्रात श्री दुर्गासप्तशती पाठ व श्री स्वामी चरित्र सारामृत पाठाचे वाचन करण्यात आले.सांयकाळी पाच वाजता संगम घाटावरुन मंदिरापर्यत पालखी सोहळा झाला.सहा वा.औंदुबर प्रदक्षिणा करण्यात आली.साडेसहा वा.नैवेध आरती झाली.सात वाजता.विविध विषयावर मान्यवंराचे मार्गदर्शन झाले. सांयकाळच्या सत्रात सप्ताहाकाळातील नित्यसेवा,नित्यध्यान,श्री विष्णुसहस्त्रनाम पठण आदी सेवा करण्यात आल्या.आज मार्गशिष्य महिन्यातील दुसरा गुरुवार असल्याने स्वांमीच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी होती.उद्या हवनयुक्त श्री गीताई याग होणार आहे.तरी स्वामीभक्त भाविकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.सप्ताहामुळे मंदिरात अखंड 24 तास प्रहर सेवा सुरु आहे.आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ  त्रंबकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकसह,नृसिंहवाडी, पीठापूर,गाणगापूर,तसेच परदेशातील सेवा केंद्रात एकाचवेळी दत्तजंयतीनिमित्त श्री गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताह काळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,श्री स्वामीसेवक,भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकांना सप्ताहाकाळात अन्नदान सेवा करण्यासाठी धान्य, वस्तु,पदार्थ, देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,(दत्तधाम) येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!