गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयात्रेचे अन्नपूर्णा हॉटेलच्यावतीने स्वागत

Spread the love
गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयात्रेचे अन्नपूर्णा हॉटेलच्यावतीने दिमाखात स्वागत

रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील भक्तगणांचे मनोरथ सिध्द करणारी गावखडी ते अक्कलकोट मनोरथ पूर्ती पदयाञा प्रतिवर्षी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ गावखडी मठाधिपती श्री सदगुरू दास दिगंबर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेञ गावखडी ते श्री क्षेञ अक्कलकोट दि.13 डिसेंबर ते दि.30 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.यावेळी या पदयात्रेचे स्वागत हातकणंगले येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे स्वागत करण्यात आले.तर यावेळी महादेवराव माने यांनी सर्व स्वामिभक्तांना पदयाञेचे महत्व पटवून दिले या पदयात्रेचे हे अठरावे वर्ष आहे.हि पदयाञा ३० डिसेबर रोजी अक्कलकोट येथे जाणार असल्याची माहिती महादेवराव माने यांनी सांगितले.
error: Content is protected !!