‘चिंताजनक बातमी’ १०७ वर्षांपूर्वीचे वाचनालय इतिहास जमा होण्याच्या मार्गावर

Spread the love
दानोळीतीलल बॅलिस्टर खर्डेकर वाचनालयाची दुरावस्था
१०७ वर्षांपूर्वीचे वाचनालय इतिहास जमाच्या मार्गावर
जयसिंगपूर / प्रतिनिधी
दानोळी येथील सुमारे १०७ वर्षापूर्वीचे ऐतिहासिक वाचनालय सध्या प्रचंड दुरावस्थेत आहे.अनेक दुर्मिळ पुस्तकांचे वाचनालय इतिहासजमा होणार की काय? अशी भीती वाचकातून व्यक्त होऊ लागली आहे.दानोळी गावचे सुपुत्र आणि राजघराण्याचा वारसा असणारे बॅलिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या नावाने दानोळी येथे १९१६ साली सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली होती.आज या वाचनालयाला १०७ वर्षं पूर्ण होत आहेत.या वाचनालात अनेक इतिहासकालीन दुर्मीळ स्वरूपाची सुमारे ३५०० पुस्तके आहेत.शिवाय स्पर्धा परीक्षेसाठी लागणार्‍या यूपीसी,एमपीसीसह अनेक वाचनीय पुस्तके संग्रहित आहेत.आजच्या सोशल मिडीया स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये अशा वाचनीय पुस्तकांकडे वाचकांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून हे ग्रंथालय बंद अवस्थेत आहे.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि  मध्यवस्तीत असणारे या वाचनालयाकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. लोखंडी कपाटे सडत आहेत.साहित्य विखुरलेले आहे.छत जमिनीवर येऊन टेकले आहे.पुस्तके खराब होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता दानोळी गावांतील हे ऐतिहासिक बाळासाहेब खर्डेकर वाचनालयातील पुस्तकांचे डागडुजी करून लवकर नवीन जागेत स्थलांतर करून वाचकांसाठी खुले करावे अशी मागणी आता जोर धरू लागले आहे
error: Content is protected !!