कन्या विद्या मंदिर दत्तनगर येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

 

येथील दत्तनगरमधील कन्या विद्या मंदिर येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम राबविण्यात आला शिरोळ पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत यांच्या अध्यक्षतेखाली व कविता सागर पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि पोस्टल लायब्ररीचे प्रमुख डॉ.सुनिल पाटील यांच्या प्रयत्नातून वाचनालय आपल्या दारी हा उपक्रम सोमवारपासून शाळेत सुरू आहे.सदर उपक्रमाची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी दत्तात्रय सुर्यवंशी उपस्थित होते.तसेच प्रा.डॉ.सुनिल पाटील यांनी वाचनालय आपल्या दारी उपक्रमाची माहिती दिली तसेच विस्तार अधिकारी दिपक कामत मासिक इंद्रधनुष्यचे सहसंपादक संजय सुतार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घोरपडे अध्यापिका अस्मिता सुतार,सौ.रुपाली भगाटे, राजाराम सुतार,किरण पाटील,सुजाता खोत यांच्यासह सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.सुत्रसंचलन दिलीप कोळी यांनी केले.इनास बारदेसकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!