श्री म्हसोबा मंदिर जीर्णोद्धारासाठी फल्ले दांपत्याची लाखमोलाची मदत

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ मधील कोळी समाज बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या श्री म्हसोबा मंदिराच्या जीर्णोदरासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ उर्फ पिंटू फल्ले व सौ शुभांगी फल्ले या दापत्याने एक लाख एक हजार रुपये रोख रक्कम आणि मंदिराला लागणारा कळस भेट देऊन सामाजिक दायत्व जपले.गेल्या काही दिवसापासून येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे.या जीर्णोद्धारासाठी निळकंठ फल्ले व शुभांगी फल्ले यांनी एक लाख एक हजार रुपये रोख रक्कम श्री म्हसोबा देवालय जीर्णोद्धार समितीकडे सुपूर्द केली तसेच स्वखर्चाने मंदिरांवरील कळस आणि कळस बसवण्यासाठी लागणारा खर्च देणार असल्याचे जाहीर केले.यावेळी निळकंठ फल्ले,शुभांगी फल्ले,मंदिराच्या पुजारी लता आंबी-कोळी,चंद्रकांत कोळी,माजी सरपंच गजानन संकपाळ,चिमण कोळी,सुधीर कोळी,शशिकांत कोळी,ज्ञानेश्वर कोळी अवधूत कोळी,सर्जेराव कोळी  यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.
error: Content is protected !!