हाप स्पीच क्रिकेट स्पर्धेच्या वर्चस्वातून शिरोळ स्मशानभूमीत करणी व भानामातीचा प्रकार
शिरोळ / प्रतिनिधी
हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळया बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून करणी व भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आला येथील अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी स्मशानभूमीतील करणी व भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः त्या ठिकाणाहून काढून तो परिसर स्वच्छ केला व असे प्रकार समाजात भीती निर्माण करण्यासाठी होत असतात पण याचा कुणावरही विपरीत परिणाम होत नाही असे सांगितले.गेल्या दोन दिवसापासून अज्ञात व्यक्तीने हळदी कुंकू,सुपारी व अन्य साहित्य आणि काळ्या बाहुल्या विविध क्रिकेट संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या स्मशानभूमीत पुजल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेमुळे शिरोळ शहरात भीतीचे वातावरण पसरले स्मशानभूमीत कुणी आणि का ? भानामती करणी व आघोरी कृत्य करण्याचा प्रकार केला याची माहिती कोणालाच नव्हती रविवारी रक्षाविसर्जनाच्या निमित्ताने स्मशानभूमीत नागरिकांची मोठी गर्दी होती स्मशानभूमीत झालेला हा प्रकार पाहून चर्चेला उधाण आले कोणी कशासाठी असा प्रकार केला याची उलट सुलट चर्चा सुरू झाली पण करणी व भानामती या प्रकाराने नागरिक चांगलेच धास्तावले होते.करणी की भानामातीचा प्रकार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत.रक्षाविसर्जनासाठी उपस्थित असणारे पत्रकार डी आर पाटील चंद्रकांत भाट सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना देऊन स्मशानभूमीत बोलावले हेरवाडे हे तात्काळ स्मशानभूमीत येऊन करणी व भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः बाजूला केले त्या ठिकाणी काळ्या बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिले असता त्या ठिकाणी चार चिठ्ठ्यामध्ये हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघाची व खेळाडूंची नावे मिळून आली त्यामुळे हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञातानी केल्याचे स्पष्ट झाले.यावेळी खंडेराव हेरवाडे म्हणाले की अंधश्रद्धेच्या पोटी असे प्रकार घडत असतात यामुळे समाजात भीती निर्माण होते असे करून काही साध्य झाले असते तर जगावर ही राज्य करता आलं असतं पण करणी व भानामती प्रकाराने कोणावरही विपरीत परिणाम होत नाही यामुळे अशा प्रकाराबाबत कोणीही घाबरून जाऊ नये असे सांगितले.मात्र या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रध्देचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळत आहे.राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरताना दिसत आहे.