मधुमेहाचा आजार,लक्षणे,त्यावरील उपचार पहा हा व्हिडीओ

Spread the love

मधुमेहाचा आजार? काय आहेत लक्षणे?त्यावरील उपचार

मधुमेह एक जागतिक समस्या
२०५० पर्यंत ६०% भारतीय लोकांना मधुमेहाचा धोका असे आर्टिकल इंटरनॅशनल नियतकालिकाने ऑलरेडी छापले होते आणि त्याला कारण हि तसंच आहे.
मधुमेहाची कारणे – पिस्टमय पदार्थांचा आहारातील जास्त डाएट, व्यायाम व हालचाल कमी असणे, सतत A. C /फॅन खाली असणे, बैठे काम, चिंता, शोक, अति गोड पदार्थ खाणे, व्हिटॅमिन डिफीसिएनसी.
लक्षणे – वजन वाढणे, रक्तदाबाचा त्रास होणे,थकवा येणे,उत्साह कमी होणे,कुठलेही काम करायला /चालायला नको होणे, सारखे लघवीला येणे,भूक न आवरणे.
तपासणी -BSL FF, PP, Urine R,Hb1Ac.
अपथ्य (काय खाऊ नये) – बटाटा,रताळी, पिस्टमय पदार्थ,चहा-कॉफी, जागरण, गोड पदार्थाचे सेवन,आंबा,चिकू,द्राक्षे, देशी ज्वारी, पापड,लोणचे,गूळ,उसाचा रस,मका.
पथ्य (काय खावे )- हायब्रीड ज्वारीच्या कन्या, हायब्रीड ज्वारीच्या लाह्या, हायब्रीड ज्वारी, बाजरी,नाचणी,गहू आणि कोद्रू या 5धान्याची मिळून भाकरी करणे, लिंबू, संत्री, कारले, ढबू मिरची, घेवडा,भेंडी, गवारी, वांगी, शेवगा, कडधान्ये, पालेभाज्या, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, काकडी, बिन पॉलिशचा भात, वरिचा भात
आयुर्वेदिक औषधे – वसंत कुसुमाकर रस, जम्बासव, फलत्रिकादी क्वाथ.
उपाय –
1)पिस्टमय पदार्थाचा कमी वापर
2)रात्री एका ग्लासभर पाण्यात 8पनीर फुल भिजत ठेवावे व सकाळी 5वासता ते पाणी प्यावे.
3)रात्री एका ग्लासभर पाण्यात 3जुनाट भेंडी कापून ठेऊन, सकाळी ते पाणी प्यावे.
4)आठवड्यातून एकदातरी स्टीम बाथ घ्यावा.
5)मधूनाशिनी, जांभूळ बीज, गुडूची, नींब यांचे चूर्ण सम मात्रेत,गरम पाण्यातून 2चमचे, दिवसातून 2वेळा घेतल्यास मधुमेह कमी होतो.
6)रात्री एका ग्लासभर पाण्यात थोडे मेथी दाणे भिजत ठेवावे व सकाळी ते प्राशन करावे.
7) 5-7सीताफळाची /सदाफुलीची पाने चगळून खावीत.
अधिक माहितीसाठी
डॉ.ओंकार निंगनुरे मोबा. 9175723404
error: Content is protected !!